दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या दीपस्तंभ मनोबलचे कार्य पाहता त्यांचा आवाका हा नक्कीच संपूर्ण देशभरात जाईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुण्यातील दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल संस्थेच्या विस्तारित इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दीपस्तंभ संस्थेचा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्या दीपस्तंभ मनोबलचे कार्य पाहता त्यांचा आवाका हा नक्कीच संपूर्ण देशभरात जाईल, असा विश्वास पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले कि, येथे शिकत असलेले विद्यार्थी हे शारीरिक तसेच आर्थिक अशा कुठल्याही अडचणीत एकटे नसून सर्व समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. या विद्यार्थ्यांसाठी संस्थेचे कार्य हे नावाप्रमाणे दीपस्तंभासमानच आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी हिरिरीने झटणाऱ्या या संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून, त्यांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही देखील यावेळी पाटील यांनी दिली.
याप्रसंगी ज्येष्ठ शास्त्रज्ञ, पद्म विभूषण डॉ.रघुनाथ माशेलकर, संस्थेचे प्रमुख यजुर्वेद महाजन, IRS अधिकारी पूजा कदम, पॅराऑलम्पिक विजेते सचिन खिल्लारे, पोलिस सब इन्स्पेक्टर कल्याणी नजन, विक्रीकर अधिकारी सचिन गोरे, बँक प्रोबेशनरी अधिकारी सुदर्शन काळे, उपजिल्हाधिकारी तन्मय मांडरेकर, सहाय्यक गट विकास अधिकारी मधुकर बिलगे, स्वाती मोरे (असिस्टंट मॅनेजर न्यू इंडिया अश्युरंस), पोलिस सब इन्स्पेक्टर सिद्धेश्वर जंगले महाजन यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला.
यावेळी दीपस्तंभ मनोबल परिवाराचे हितचिंतक चंद्रकांत बोडके, शाम अग्रवाल, राजेश शहा, लुंकड कंस्ट्रक्शनचे रमणलाल लुंकड, चंद्रशेखर सेठ, ब्रेम्बोचे सुधीर निरंतर, फ्लिटगार्डचे संजय कुलकर्णी, मॅग्नाचे रूपक कर्वे आणि प्रणव देव, मनस्वी केले, पार्थ मटकरी आदी उपस्थित होते.