चंद्रकांत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश… वीज निर्मितीकरिता बालेवाडी येथील सर्व्ह न ४/१ येथील ६५ गुंठे जागा
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी सुविधा पुरवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतात. बाणेर-बालेवाडी भागातील वीज समस्या कायमस्वरूपी संपुष्टात आणण्यासाठी वीज उपकेंद्राची मागणी सातत्याने होत होती. यासाठी पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, वीज निर्मितीकरिता बालेवाडी येथील सर्व्ह न ४/१ येथील ६५ गुंठे जागा देण्यात आली आहे. यामुळे या भागातील वीजपुरवठ्याची समस्या कायम स्वरूपी सुटणार आहे. ही जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल जिल्हाधिकारी सुहास दिवसे, एमएसईबी पुणे जिल्हाचे मुख्य कार्यकारी अभियंता राजेद्र पवार आणि पुण्याचे माजी जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांचे पाटील यांनी मनापासून धन्यवाद दिले.