श्री शुक्ल यजुःशाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणे याज्ञवल्क्य आश्रम ह्यांच्या महर्षी याज्ञवल्क्य सांस्कृतिक भवन व वसतिगृह उद्घाटन सोहळा चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

पुणे : श्री शुक्ल यजुःशाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभा पुणे याज्ञवल्क्य आश्रम ह्यांच्या महर्षी याज्ञवल्क्य सांस्कृतिक भवन व वसतिगृह उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पुण्याच्या कसब्यातील श्री शुक्ल यजु: शाखीय मध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभेच्या याज्ञवल्क्य सांस्कृतिक भवन आणि वसतिगृह आश्रमाची पायाभरणी जूनमध्ये पाटील यांच्या हस्ते झाली होती. या आश्रमाच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यावेळी पाटील यांनी दिली होती. आज आश्रमातील सांस्कृतिक भवनाची वास्तू उभी राहतेय, याचा मनापासून आनंद होत आहे. या वस्तूचे उद्घाटन माझ्या हस्ते झाले. या कार्यात मला योगदान देता आले, हे मी माझे भाग्य समजतो, असे पाटील यांनी यावेळी म्हटले. संस्था शताब्दी वर्षाकडे वाटचाल करीत आहे, त्यासाठीही पाटील यांनी २३शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, भाजपा नेते हेमंत रासने, संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, राजेंद्र काकडे यांच्यासह संस्थेचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.