महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी जाहीर… कोथरूड विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर

9

पुणे : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी आज जाहीर झाली. भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. कोथरूडकर आणि भाजपाने दर्शविलेला विश्वास नक्कीच सार्थ ठरवेन, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कोथरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि उमेदवार चंद्रकांत पाटील म्हणाले की,पक्ष नेतृत्वाने पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खूप आनंदी असून आता आणखी जबाबदारी वाढली आहे.येत्या काळात आणखी विकास काम केली जाणार आहे.तसेच लोकसभा निवडणुकीत या मतदार संघातून ७४ हजारांच मताधिक्य मिळाली आहेत.यामुळे प्रचंड मतांनी निवडून येणार आणि पुन्हा एकदा महायुतीच सरकार येणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. कोथरूडमधील माझ्या प्रिय मतदार बंधू-भगिनींनो, तुमच्या प्रेम आणि विश्वासाने मला पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत तुमचा प्रतिनिधी होण्याची संधी मिळाली आहे. या संधीसाठी मी सर्व कोथरुडकरांचे मनःपूर्वक आभार मानतो. तुमचे आशीर्वाद आणि पाठबळ हेच माझे प्रेरणास्थान आहे.

पाटील पुढे म्हणाले कि, पक्षश्रेष्ठींच्या विश्वासामुळे मला पुन्हा एकदा कोथरूडच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य करण्याच्या संधीचे भाग्य लाभले आहे. मला ही संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमितभाई शाह , राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डाजी, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कोथरूडचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना मनःपूर्वक धन्यवाद. माझ्यावर वेळोवेळी दर्शविलेल्या विश्वासाबद्दल मी भारतीय जनता पार्टीचेही या निमित्ताने मनापासून आभार व्यक्त करतो. या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी अविरत प्रयत्न करेन, असे वचन देतो, असे पाटील यांनी म्हटले.

भाजपाने पुण्यातील तीन मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. पक्षाने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा रिंगणात उतरवले आहे. तर शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना तर पर्वती विधानसभा मतदारसंघांमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.