विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात महायुतीची बैठक मुरलीधर मोहोळ आणि चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न

8

पुणे : पुणे जिल्ह्याच्या महायुतीची बैठक आज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी महायुतीतील सर्व घटक पक्षातील प्रमुख नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकार परीक्षा घेत माहिती दिली. महायुतीच्या समन्वयातून लोकसभा निवडणुकीवेळी खूप चांगलं काम या जिल्ह्यात झालं असे मोहोळ यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही महायुतीचे सरकार पुन्हा येण्यासाठी सर्व कार्यकर्ते, महायुतीचे नेते सज्ज झाले असल्याचे मोहोळ यावेळी म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना मोहोळ म्हणाले कि, आज पुण्यातील २१ विधानसभा मतदारसंघाच्या रचनेमध्ये सगळ्याच पक्षाचे नेते आगामी निवडणुकीच्या कामासाठी एकत्र बसलो. यामध्ये एकूण निवडणुकीचं काम , निवडणुकांच्या बैठका, मेळावे , उमेदवारी अर्ज भरण्याबाबत ठरवेल गेले, तसेच देशातल्या आणि राज्यातल्या नेत्यांच्या सभा महायुती म्हणून कशा असाव्यात यावर चर्चा झाली असल्याचे मोहोळ यांनी सांगितले. ज्याप्रकारे देशामध्ये माननीय मोदीजींचे सरकार लोकसभा निवडणुकीनंतर आले त्याप्रकारे विधानसभा निवडणुकीमध्येही महायुतीचे सरकार पुन्हा येण्यासाठी सर्व कार्यकर्ते, महायुतीचे नेते सज्ज झालेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुतीचे सरकार येईल याबाबत आम्हाला शंका नसल्याचे देखील मोहोळ म्हणाले.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले कि, विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहील, पुणे जिल्ह्याची भूमिका महत्वाची राहील असे लक्षात घेऊन समन्वय साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मनोज जरंगे यांना आमचं काय चुकलं? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात टाकलेलं आरक्षण आपण धरूया तर ते तुम्ही ऐकलं नाही. आम्ही दिलेलं आरक्षण हे उद्धव ठाकरेंनी घालवलं . सुप्रीम कोर्टात ते आरक्षण टिकवू शकले नाही. माझी हात जोडून मनोज जरांगेना विनंती आहे कि त्यांनी सकरात्मक विचार करावा. समाज मात्र सकरात्मक विचार करेल असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.