‘निसर्गछाया’ या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होत असल्याचे पाहून आनंद वाटतो – चंद्रकांत पाटील
पुणे : आयुष्यभर कष्ट केलेल्या धकाधकीच्या जीवनात थोडा विराम घेऊन, निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवावा असे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला वाटत असते. हेच स्वप्न साकार करण्यासाठी, कोथरुड मतदार संघातील भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्गछाया’ हा अनोखा उपक्रम उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून ज्येष्ठांच्या जीवनात नवचैतन्य निर्माण होत असल्याचे पाहून आनंद वाटत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, सध्याच्या धकाधकीच्या जीवनात शहरी झगमगाटापासून दूर जाऊन कुठेतरी निसर्गाच्या सान्निध्यात नयनरम्य ठिकाणी काही काळ व्यतीत करावा असं प्रत्येक ज्येष्ठ पुणेकर नागरिकांना वाटत असतं. परंतु हाताशी असलेल्या शिदोरीमुळे प्रत्येकालाच उतारवयात हा सुखद अनुभव घेता येतो असं नाही. त्यामुळे निसर्गाचं हे विहंगम रुप प्रत्येकाला अनुभवता यावं यासाठी लोकसहभागातून पुण्यातील चांदणी चौकापासून चार किमी अंतरावर भूगाव मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘निसर्गछाया’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
सदर उपक्रमाच्या माध्यमातून पुण्यातील ज्येष्ठांना निसर्गाचा गोडवा अनुभवता येणार आहे.हा अनोखा अनुभव घेण्यासाठी बुकिंगसाठी संपर्क – 92095 60844 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पाटील यांनी केले आहे.