राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठीही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज – चंद्रकांत पाटील

5

पुणे : आज भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या समन्वय समितीची बैठक कोथरुड मधील अंबर हॉल येथे संपन्न झाली. यावेळी चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असून, लोकसभेप्रमाणे विधानसभा निवडणुकीसाठीही महायुतीचे कार्यकर्ते सज्ज आहेत, असा विश्वास महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत सर्व प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया, घटकपक्षांमधील समन्वय, महायुतीचे पदाधिकारी-समन्वयक यांची भूमिका आणि जबाबदारी याविषयी बैठकीत संवाद साधण्यात आला.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, आ. राहुल कुल, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्रामीणचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील, वासुदेवनाना काळे, शिवसेनेचे किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीपदादा गारटकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष दीपक मानकर, रिपाइं आठवले गटाचे संजय सोनावणे, दिगंबर दुर्गाडे, दीपक मिसाळ, यमराज खरात, समन्वय समितीचे पुणे महानगर समन्वयक संदीप खर्डेकर यांच्या सह महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात महायुतीची मोठी ताकद आहे. त्यामुळे ही ताकद एकवटून राज्यात पुन्हा सरकार आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात युतीची ताकद मोठी असल्याने; महायुतीलाच जनतेचा कौल मिळेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्र आणि पुण्याचे महत्त्वाची भूमिका असेल, असा विश्वास ही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.