चंद्रकांत पाटील उद्या उमेदवारी अर्ज करणार दाखल… कोथरुडकर जनतेने यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे खासदार मेधा कुलकर्णी यांचे आवाहन

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार चंद्रकांतदादा पाटील उद्या 24 ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार मेधाताई कुलकर्णी यांनी यावेळी बहुसंख्येने सहभागी होण्याचे जनतेला आवाहन केले आहे.
मेधाताई यांनी म्हटले कि, कोथरुडकर जनतेने प्रत्येकवेळी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर भरभरून प्रेम केलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपले आमदार चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उद्या २४ ऑक्टोबर रोजी कोथरुडकरांच्या आशीर्वादाने विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून आमदार चंद्रकांत पाटील उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी, सकाळी १० वाजता, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड याठिकणी आपण बहुसंख्येने उपस्थित राहूया असे आवाहन मेधाताई यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठीची भारतीय जनता पार्टीची पहिली यादी रविवारी जाहीर झाली. या यादीत भाजपाच्या वतीने कोथरूड विधानसभा मतदारसंघातून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली. २४ ऑक्टोबर २०२४ रोजी कोथरुडकरांच्या साथीने पाटील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार आहेत. अर्ज भरण्यापूर्वी पाटील प्रथम शंकर महाराज मठ, कसाब गणपती, मृत्युंजयेश्वर मंदिर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. यासोबतच छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करणार आहेत.