चंद्रकांत पाटील यांनी आज अर्ज भरण्याआधी सह पत्नी कसबा गणपती आणि शंकर महाराज मठात घेतले महाराजांचे दर्शन

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर हळूहळू एकेका पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर होत आहे. भाजपने पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली. ज्यामध्ये पुण्यातील कोथरुडमधून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील यांना पुन्हा एकदा कोथरुडमधून निवडणूक लढण्याची संधी मिळाली आहे. आज चंद्रकात पाटील हे कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. चंद्रकांत पाटील हे जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी पुण्यातील शंकर महाराज मठ आणि कसाब गणपतीचे प्रथम दर्शन घेतले.
चंद्रकांत पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आपल्या दिवसाची सुरुवात पुण्यातली शंकर महाराज मठात महाराजांचे दर्शन घेऊन केली. महाराजांच्या दर्शनाने नवी ऊर्जा प्राप्त झाली, बळ मिळाले, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
त्यानंतर पाटील यांनी कसबा गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात जुने आणि सर्वात आदरणीय मंदिरांपैकी एक येथे सपत्नीक दर्शन घेतले. कसाब गणपती पुण्याची ग्रामदेवता म्हणूनही ओळखले जाते. कोणतेही शुभकार्य करताना गणरायाला वंदन करणे ही आपली संस्कृती आहे. त्यामुळे आज निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पाटील यांनी लाडक्या गणरायाचे दर्शन घेतले.
पुण्याचे माजी खासदार आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय गिरीशभाऊ बापट यांच्या कार्यालयास देखील पाटील यांनी भेट देऊन त्यांच्या स्मृतींस वंदन केले. सर्वसामान्य जनतेमध्ये सहजपणे मिसळून त्यांना आपलेसे करण्याची हातोटी स्व. बापटांकडे होती. आज त्यांच्या कार्यालयास भेट दिली असता त्यांच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या असल्याचे पाटील यांनी म्हटले.