उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन

27

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बहुसंख्य कोथरुडकरांच्या साथीने चंद्रकांत पाटील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

विद्वत्ता, शौर्य, धैर्य आणि साहस यांचे अभूतपूर्व उदाहरण म्हणजे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज! प्रजेप्रती नितांत आस्थेमुळे महाराजांनी रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यामुळे आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रस्थान केले असता चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमधील डेक्कन चौक येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सुवर्ण पान! त्यांचे थोर व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्यासम राष्ट्रपुरुषाचा सन्मान अबाधित राखण्यासाठी महायुती कटिबद्ध आहे. हीच कटिबद्धता अधोरेखित करत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघाले असता चंद्रकांत पाटील यांनी सारसबागेजवळील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.