प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांच्या कडून चंद्रकांतदादांच्या कामाचे कौतुक

15

पुणे : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. काल उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटी-गाठी घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान शुक्रवारी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संगणक तज्ज्ञ तथा प्रसिद्ध शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेतली. यावेळी डॉ. भटकर यांनी चंद्रकांतदादांच्या कार्याचे कौतुक केले.

भारतीय जनता पक्षाकडून चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कोथरूड मधील विठ्ठल मंदिरात काकड आरतीला उपस्थिती लावली. त्यानंतर  विविध क्षेत्रातील मान्यवर आणि प्रथितयश व्यक्तींच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली.

या भेटीमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांना व्यापक समर्थन मिळत असून, प्रत्येक भेटीमध्ये त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले जात आहे. त्यामुळे नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत प्रचारात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. शुक्रवारी प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ विजय भाटकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेतल्या. यावेळी डॉ. भटकर यांनी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले.

यासोबतच चितळे बंधू मिठाईवालेचे संजय चितळे, इंद्रनील चितळे, प्रसिद्ध कथक नृत्यांगना गुरु शमा भाटे, विनीत कुबेर, रवींद्र घाटपांडे, भूपाल पटवर्धन, डॉ. दीपक शिकारपूर आदींच्या भेटीगाठी घेऊन, अनौपचारिक संवाद साधला.

Get real time updates directly on you device, subscribe now.