बाणेर, बालेवाडी भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने लागला मार्गी, १८ कोटी लिटर पाणी केले उपलब्ध

15

पुणे : वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी शहरात उंचच उंच इमारती उभ्या राहतात. पण या इमारतीत राहणाऱ्यांना हळू-हळू कमी पडू लागतं जीवन, म्हणजेच पाणी… पुण्यातही अनेक ठिकाणी तसेच झाले. रोजगाराच्या संधींमुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक पुण्यात येऊ लागले, स्थिरावू लागले. पण पाणी तितकेच राहिले. आणि वाढत्या उपनगरांमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली.

अन्य उपनगरांप्रमाणे कोथरूड मतदारसंघातील बाणेर, बालेवाडी हा भागही झपाट्याने विकसित झाला. पण या भागातही समस्या सतावू लागली, मुबलक पाण्याची. वाढत्या वस्तीमुळे या भागातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होऊ लागला होता. रहिवासी त्रस्त झाले होते. महानगरपालिकेच्या २४ तास पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत या भागासाठी टाकी मंजूर झाली होती, पण काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळेच बाणेर बालेवाडी भागातील रहिवासी आणखी अडचणीत आले होते.

हा विषय आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या कामाला गती दिली. विकासकामात लोकसहभाग असावा. हा दादांचा कटाक्ष असतो. लोकसहभागातूनच त्यांनी १८ कोटी लिटर पाणी बाणेरसाठी उपलब्ध करून दिले. तसेच २०२३च्या मे महिन्यात पाण्याच्या टाकीचे काम पूर्ण करून पाणी प्रश्न संपुष्टात आणला. या कामाला गती दिली. टाकीचे काम पूर्ण झाले आणि १८ कोटी लिटर पाणी मिळू लागल्याने बाणेर, बालेवाडी भागात मुबलक पाणी मिळू लागले.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.