दादा कोथरुड मधून तू दणक्यात निवडून येणार!, रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अरविंद कोल्हटकरांचे आशीर्वाद
पुणे : दादा तू कोथरूड मधून दणक्यात निवडून येणार, असे आशीर्वाद रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांनी दिले. भाजपा महायुतीच्या प्रचारासाठी चंद्रकांतदादा पाटील यांनी घरोघरी संपर्कावर भर दिला आहे. या अभियानाअंतर्गत कोथरुड विधानसभा मतदारसंघातील विविध सोसायटीतील प्रथितयश नागरिकांच्या भेटी घेऊन पाच वर्षांचा कार्य अहवाल देऊन मतदारांचे आशीर्वाद घेत आहेत.
कोथरूड मधील रोहन प्रार्थना सोसायटीतील भेटीदरम्यान संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक तथा माजी प्रचारक अरविंद कोल्हटकर यांची चंद्रकांतदादा पाटील यांनी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी दादा तू दणक्यात निवडून येणार! असे आशीर्वाद कोल्हटकर यांनी पाटील यांना दिले.
यावेळी भाजप कोथरुड दक्षिणचे अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा युवा मोर्चा पुणे शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ, प्रभाग १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, कोथरुडचे निवडणूक सहप्रमुख नवनाथ जाधव, कोथरुड मंडल सरचिटणीस दिनेश माथवड, युवा मोर्चाचे अमित तोरडमल उपस्थित होते.