पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीतील ‘मॉक पोल’ला भाजपचा विरोध – विजय वडेट्टीवार

83

मुंबई : विधानसभा निवडणुकीत महायुतीला अतिशय उत्तम असे यश मिळाले. या यशानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर हल्लाबोल केला. मतदानयंत्राद्वारे मतदानात गैरप्रकार झाल्याचा आरोप करत तसेच मतपत्रिकेच्या माध्यमातूनच निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी १५व्या विधानसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सदस्यांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला. माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना महायुती सरकारवर हल्लाबोल केला. आपलं पितळ उघडे पडेल म्हणून मारकडवाडीतील ‘मॉक पोल’ला भाजपचा विरोध असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.

वडेट्टीवार म्हणाले कि खरंतर आपण पाहतोय कि एवढ्या बहुमताचा आकडा पार करणारे सरकार आल्यानंतर आपल्या राज्यमध्ये जे वातावरण दिसायला हवं , एखाद्या सणासारखा वातावरण  दिसायला हवं ते वातावरण दिसत नाहीये. महाराष्ट्रामध्ये शोककळा पसरल्यासारखं वातावरण आहे. हा खरंतर जनतेचा उत्साह असता, परंतु तस दिसत नाही. याचा अर्थ असा आहे कि, कुठे ना कुठे डाल में  कुछ काला है.

वडेट्टीवार पुढे म्हणले, लोकांनी दिलेले जे मतदान आहे त्याप्रमाणे जर हे सरकार आलं असतं तर मारकटवाडीमध्ये जो काही विषय गावकऱ्यानी घेतला आहे, त्याला विरोध करायचं काही कारण नव्हतं. त्याला विरोध करायचं म्हणजे आपलं पितळ उघडे पडेल कदाचित हा संशय यामधून निर्माण होऊ शकतो. तिथे जो काही प्रकार सुरु आहे, लाठीमार झाला आहे. तिथे ८० % मतदान मिळाले. संपूर्ण गाव विरोधात आहे. तिथे निवडून आलेल्या आमदारांनीच संशय व्यक्त केला आहे.  याचा अर्थ लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम महायुती सरकारकडून सुरु झालं आहे, असे वडेट्टीवार यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.