सायकलवर अयोध्या यात्रेला निघालेल्या युवकांच्या जर्सीचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण संपन्न

12

पुणे : कोथरूडमधील दोन युवक एक अनोखी यात्रा करणार आहेत. सायकलद्वारे पुणे ते अयोध्या अशी यात्रा हे दोन तरुण करणार आहेत. सुयोग शहा आणि नारायण पवार हे युवा दिनाचे औचित्य साधून सायकलद्वारे पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत. यासाठी कोथरूड मतदार संघाचे आमदार तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज त्यांच्या जर्सीचे अनावरण करण्यात आले. चंद्रकांत दादा पाटील यांनी या दोघांचेही अभिनंदन करुन त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

कोथरुड मतदारसंघातील रहिवासी सुयोग शहा आणि नारायण पवार हे युवा दिनाचे औचित्य साधून सायकलद्वारे पुणे ते अयोध्या यात्रा करणार आहेत. १० जानेवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक कोथरूड येथून ते अयोध्येच्या दिशेने प्रयाण करणार आहेत. त्या दिवशी एकादशी असल्यामुळे आळंदी येथे माऊलींचे दर्शन घेऊन ते पुढे मार्गस्थ होतील. त्यांच्याबरोबर पुणे ते आळंदीपर्यंत कोथरुडमधील सायकलस्वार शुभेच्छा देण्यासाठी सकाळी 6 वाजता जाणार आहेत. आज त्यांच्या जर्सीचे अनावरण चंद्रकांत पाटील यांनी केले व दोघांचेही त्यांनी अभिनंदन करुन त्यांना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.