पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासकामांची चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी
पुणे : पुण्यातील पर्वती टेकडीवरील श्रीमंत बाजीराव पेशवे आणि नानासाहेब पेशवे स्मारकाच्या विकासाचे काम समाधानकारक झाले असून, पहिल्या टप्प्यातील विकासकामांचे लोकार्पण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासगळ्याची पाहणी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली.
चंद्रकांत पाटील यांनी आज या सर्व कामाची पाहणी करून आढावा घेतला. पर्वतीवरील बाजीराव पेशवे स्मारक आणि नानासाहेब पेशवे संग्रहालयाची विकासकामे जिल्हा नियोजन, आमदार निधी आणि लोकसहभागातून करण्यात येत आहेत. श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पुर्णाकृती पुतळा परिसराच्या सुशोभिकरणासह; पेशवे कालीन इतिहासावर आधारित भित्तीचित्रे साकारण्यात येत असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
यावेळी भाजप प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवे, देवदेवेश्वर संस्थाचे रमेश भागवत, शिल्पकार विवेक खटावकर आदी उपस्थित होते.