झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमा मार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रकरणे प्रलंबित राहू नये, यासाठी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक संपन्न

मुंबई : झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमा मार्फत उच्च व तंत्र शिक्षण विभागातील प्रकरणे प्रलंबित राहू नये, यासाठी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक घेण्यात आली. संचालनालयाकडे प्राप्त तपशीलाच्या आधारे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याबाबत संचालनालय स्तरावर विचार विनिमय करुन कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. या बैठकीस संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत सर्वप्रथम प्रलंबित प्रकरणे, टपालाचे वर्गीकरण करण्यात आले आहे. अनुकंपा, वैद्यकीय देयके, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे, अर्जित रजा रोखीकरण प्रकरणे, वेतननिश्चिती प्रकरणे, सेवानिवृत्ती प्रकरणे यांचा यामध्ये प्रकर्षाने समावेश करण्यात आला आहे. विभागातील ३१ डिसेंबर २०२४ पर्यंतची एकूण ४,४७० प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. उर्वरित प्रकरणे ३१ जानेवारी पर्यंत निकाली काढण्याचे उद्दिष्ट या बैठकीत ठेवण्यात आले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.