मा.आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त 75 जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन… मंत्री चंद्रकांत पाटील यांची सोहळ्यास प्रमुख उपस्थिती

पुणे : आपल्या मुला-मुलीच लग्न मोठ्या थाटात व्हावं ही प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे हे सर्वांनाच शक्य होत नाही. समाजाची हीच गरज ओळखत केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांच्या माध्यमातून मा.आमदार जगन्नाथ उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त 75 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार जगन्नाथ आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. आप्पासाहेबांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून ७५ जोडप्यांचा सामुहिक विवाह सोहळा देखील आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी नवविवाहित दाम्पत्यांना त्यांच्या भावी वैवाहिक जीवनासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी केमिस्ट असोशियन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टचे पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य व सभासद उपस्थित होते.