उमेद फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

25

पुणे : पुण्यातील उमेद फाऊंडेशन ही संस्था समाजातील दिव्यांग मुलांसाठी काम करणारी संस्था आहे. दिव्यांग मुलांच्या शारिरीक आणि बौद्धिक विकासासाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी ‘बालक पालक’ हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प संस्थेच्या वतीने सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पाचे आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.

उमेद फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम अतिशय कौतुकास्पद असून या उपक्रमात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले. यासोबतच त्यांनी संस्थेला शुभेच्छा देखील दिल्या.

यावेळी सुहासराव हिरेमठ, साहित्यिक अच्युत गोडबोले यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.