कोथरुड मधील सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा घेतला सविस्तर आढावा

45

पुणे : कोथरूडमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. तपास जलदगतीने करुन चोरांच्या मुसक्या आवळा, असे निर्देश यावेळी पाटील यांनी दिल्या.

कोथरुड मधील सोनसाखळी चोरीच्या घटनेनंतर आज चंद्रकांत पाटील यांनी अलंकार पोलीस ठाण्यात जाऊन कार्यवाहीचा सविस्तर आढावा घेतला. भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना कराव्यात. त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देखील या प्रसंगी पाटील यांनी दिली.

यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल पठारे आणि अलंकार पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुमिता रोकडे यांनी आरोपींची ओळख पटली असून, तपास शेवटच्या टप्प्यात असल्याचे सांगितले. लवकरच आरोपींना पकडण्यात यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.