आगामी काळात महिलांचे विशेषतः वस्ती भागातील महिलांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी कोथरूडमध्ये ‘सुखदा’ नावाने उपक्रम सुरू करण्याचा चंद्रकांत पाटील यांचा मानस

पुणे : कोथरुड मधील प्रत्येक मुलगी ही आपलीच लेक आहे या भावनेतून कोथरूडमधील मुलींच्या विकासासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार यांच्या पुढाकाराने “मानसी” उपक्रम सुरू करण्यात आला. या माध्यमातून मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासवर विशेष भर दिला. त्याचा अतिशय सकारात्मक परिणाम झाला असून, ‘मानसी’ उपक्रमातील माझ्या लेकींचा आत्मविश्वास कमालीचा वाढला असल्याचे पाटील यांनी म्हटले. या अनुषंगाने कोथरूडमध्ये ‘सुखदा’ नावाने उपक्रम सुरू करण्याचा मानस असून, कोथरुड मधील केळेवाडी भागात २७ जानेवारी पासून हा उपक्रम सुरू होत आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने आता कोथरूडमध्ये ‘सुखदा’ नावाने उपक्रम सुरू करण्याचा मानस असून, कोथरुड मधील केळेवाडी भागात २७ जानेवारी पासून हा उपक्रम सुरू होत आहे. आज या उपक्रमाअंतर्गत सुरू होत असलेल्या केंद्राची पाहणी करून पाटील यांनी आढावा घेतला. महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी त्यांना आवश्यक सर्व सोईसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना उपक्रमाशी संबंधित सर्वांना देण्यात आल्या.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, आगामी काळात महिलांचे विशेषतः वस्ती भागातील महिलांचे आरोग्य उत्तम रहावे; यावर माझा भर आहे. बालपण, किशोरवय, लग्न आणि संसार या संपूर्ण प्रवासात स्त्री स्वतःमध्ये एवढी गुरफटून जाते की, स्वतः च्या आरोग्याकडे लक्ष द्यायला तिला वेळच मिळत नाही. गरोदर काळात स्त्रीला उत्तम आहार, चांगल्या सवयी, योगा आणि वैद्यकीय सल्ला याची नितांत आवश्यकता असते. हाच नव्या उपक्रमाचा मुख्य धागा असल्याचे त्यांनी सांगितले.