चंद्रकांत पाटील यांनी भाजपाचे माजी आमदार नारायणराव वैद्य यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांची घेतली भेट, नारायणरावांना वाहिली श्रद्धांजली

18

पुणे : भाजपाचे माजी आमदार नारायणराव वैद्य यांचे नुकतेच निधन झाले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी वैद्य कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले, अन् नारायणरावांना श्रद्धांजली वाहिली. या भेटीत विद्यार्थी परिषदेच्या काळातील त्यांच्या सहवासातील अनेक आठवणींना उजाळा मिळाला.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ते जनसंघापर्यंतच्या वाटचालीत आमदार नारायणराव वैद्य यांनी अतिशय समर्पित भावनेने काम केले. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. पुण्यामध्ये जनसंघ रुजविण्यात त्यांची मोलाची भूमिका होती. १९७० ते १९८५ या कालावधीत जनसंघाच्या माध्यमातून नगरसेवक आणि १९७४-७५ दरम्यान पुणे महापालिकेत उपमहापौरपद आदी पदे त्यांनी भूषविली. याशिवाय पिंपरी चिंचवड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी अतिशय समर्थपणे जबाबदारी सांभाळली.

आमदार नारायणराव वैद्य यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, नातवंडे, जावई असा परिवार आहे. कसबा पेठेतील तळागाळातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासह राज्यभरतील शिक्षण, उद्योगपती यांच्यासोबत त्यांचे चांगले संबंध होते. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.