चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूड विधानसभेत दिलेले 77400 सदस्य नोंदणीचे लक्ष्य पूर्ण, सर्व सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कोथरुडकरांचे पाटील यांनी मानले आभार

19

पुणे : भारतीय जनता पार्टी हा आजच्या घडीला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष. सर्वसामान्य भारतीयांच्या प्रश्नावर लढत, हिंदुत्ववादी विचारधारा खांद्यावर घेऊन भाजपाने वाटचाल केली. कार्यकर्ता आणि प्राथमिक सदस्य हा कोणत्याही पक्षाचा मुलाधार. हा आधार भक्कम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने देशभर सदस्यता नोंदणी मोहीम सुरु केली. आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीला आपल्या मतदारसंघात सदस्य नोंदणीचे लक्ष्य दिले. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड विधानसभेत दिलेले 77400 सदस्य नोंदणीचे लक्ष्य आज पूर्ण झाले.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत म्हटले कि, भारतीय जनता पार्टीची विचारधारा, संघटनेच्या माध्यमातून राबविलेली कामे, आणि सरकारच्या माध्यमातून झालेली विकासकामे यांच्यावर विश्वास ठेऊन, भाजपाच्या सदस्य नोंदणीला कोथरूडच्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला. त्याबद्दल माझे सर्व सहकारी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि माझे कोथरूडकर यांचा मी मनापासून आभारी आहे. 2 ते 303 असा खासदारांचा प्रवास झाला, तो कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या पाठींब्याच्या बळावर. चला, एकत्र येऊया… आपल्या भारतमातेला विश्वगुरु बनवूया, असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.