चंद्रकांत पाटील यांनी कोथरूडमध्ये लावलेल्या झाडांना समाजकंटकांकडून आग लावण्याचा प्रयत्न, वनविभाग आणि टेकडीवर येणारे सामान्य कोथरुडकर यांच्या मदतीने झाडांना जागविण्याचा प्रयन्त यशस्वी
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुडमधील महात्मा, म्हातोबा आणि एआरआय टेकडी येथे ६५०० झाडे लावण्यात आली होती. मात्र काही समाजकंटकांनी आग लावून ती झाडे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. यात २५०० झाडांना आगीची झळ बसली.
ही झाडे जगली पाहिजेत, हा चंद्रकांत पाटील यांचा आग्रह होता. झळ बसलेल्या झाडांना जगविण्यासाठी पाटील यांच्या ८ जणांच्या टीमने, वनविभाग आणि टेकडीवर येणारे सामान्य कोथरुडकर यांच्या मदतीने अथक प्रयत्न केले. त्यामुळे या झाडांना पुन्हा एकदा पालवी फुटली आहे. केलेल्या कष्टाचे चीज झाल्यामुळे एक वेगळाच आनंद होत असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळे उपक्रम राबवत असतात. यंदा त्यांनी कोथरुडमधील महात्मा, म्हातोबा आणि एआरआय टेकडी येथे ६५०० झाडे लावली होती. त्याची देखभाल देखील त्यांच्या टीमकडून करण्यात येत आहे.