राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचलंच पाहिजे – चंद्रकांत पाटील

8

पुणे : जाधवर इन्स्टिट्यूटच्या वतीने आयोजित ८ व्या युवा संसदेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी ग्रामसभा ते लोकसभा विषयांवर विचार मांडताना, “राजकीय आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान वाचलंच पाहिजे”, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, या उपक्रमात महाविद्यालयीन अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांमधले नेतृत्वगुण विकसित करणं, देशाचं ग्रामपंचायत ते लोकसभा यासाठी सक्षम नेतृत्व तयार करण हा यांचा प्रयन्त आहे. ग्रामसभा ते लोकसभा विषयांवर विचार मांडताना पाटील म्हणाले, आपल्या देशामध्ये प्रामुख्याने राजा राज्य चालवणार, प्रजेकडून कर गोळा करणं आणि त्यातून गोळा होणाऱ्या पैशातून प्रजेचे संरक्षण करणे, त्यांचा विकास करणे अशी मोठी परंपरा चालत आली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लोकसभेत मांडली. त्यानंतर लोकांनी निवडून दिलेला नागरिक राज्य चालवायला लागला. आंबेडकरांनी सर्वाना सामान अधिकार दिले. समानतेचं मोठं बीज त्यांनी तयार केलं. घटनेचा पायाच समानतेवर निर्माण झाल्यामुळे कुणीही निवडणूक जिंकू शकतं. त्यामुळे सामान्य पार्श्वभूमीएचे जे राजकारणात आहेत त्यांनी आंबेडकरांना रोज नमस्कार करूनच कामाला सुरुवात केली पाहिजे असे पाटील यावेळी म्हणाले.

पाटील पुढे म्हणले, आज आम्ही आमच्या प्रतिभेप्रमाणे काम करत आहोत, सामान्य माणसाची सेवा करत आहोत. हि मोठी संधी मिळाल्यामुळे आपण नेहमी सज्ज असले पाहिजे. २०२९ मध्ये विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये महिलांना असणारे आरक्षण याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, येणाऱ्या ५ वर्षाच्या कालावधीमध्ये महिलांनी सर्व शिक्षण घेणे आवश्यक आहे. त्यासाठी घटना वाचणे महत्वाचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. राज्य म्हणजे काय, केंद्र म्हणजे काय, काय झाल्यास काय करावे या सगळ्या प्रश्नांची उत्तर म्हणजे घटना. घटना बदलता येत नाही त्यामध्ये दुरुस्ती करता येते. मोदीजींनी महिलांना विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण देण्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती केली अशी माहिती पाटील यांनी दिली.

या कार्यक्रमात खासदार अरविंद सावंत आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांना आदर्श खासदार व आमदार पुरस्काराने गौरविण्यात आले.

यावेळी जाधवर इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष ॲड. शार्दुलराव जाधवर, माजी केंद्रीय मंत्री खा. डॉ. भागवत कराड, खा. अरविंद सावंत, माजी मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आ. सत्यजित देशमुख, आ. अमित गोरखे, विठ्ठल काटे, सचिन शेलार, मंगेश ससाणे यांच्या सह इतर मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.