पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यामुळे आज प्रत्येक मराठी व्यक्तीला अभिमान वाटतो – उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

13

पुणे : राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत आयोजित तिसरे मराठी विश्व साहित्य संमेलनाचे उदघाटन ३१ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. हे अधिवेशन ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालच्या मैदानात होत आहे. आज उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री उदय सामंत यांनी तिसऱ्या विश्व मराठी संमेलनानिमित्त आयोजित स्नेह मेळाव्यात सहभाग घेतला.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, या संमेलनासाठी देश विदेशातील मराठीजन पुण्यात आले आहेत. “आपल्या भाषेचं वैभव अतिशय मोठं आहे. आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने नुकताच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे आज प्रत्येक मराठी व्यक्तीला अभिमान वाटतो आहे,” अशी भावना पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.

हे संमेलन मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन आहे. या संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित, युवा आणि मराठी भाषा, स्त्री साहित्य आणि मराठी, बालसाहित्य, संत साहित्य आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत.

Get real time updates directly on you device, subscribe now.