कोथरुडमधील रस्ते विकासाकरिता जमीन अधिग्रहणाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून निधी आणणार – चंद्रकांत पाटील

68

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुड विधानसभा मतदारसंघातील मिसिंग लिंकचा आढावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेतला तसेच रस्ते विकासामध्ये येणाऱ्या अडचणींची सविस्तर माहिती घेतली. कोथरुडमधील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विकास आराखड्यातील रस्त्यांचे प्रश्न जलदगतीने मार्गी लावावेत, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना देतानाच, रस्त्यांच्या विकासासाठी राज्य सरकारकडूनही निधी आणू, अशी ग्वाही देखील या प्रसंगी दिली. कोथरुडमधील रस्ते विकासाकरिता जमीन अधिग्रहणाचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारकडून निधी आणणार, असे पाटील यावेळी म्हणाले.

या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. पाटील यांनी माहिती दिली कि, महानगरपालिकेला गेले काही दिवस हा आग्रह धरत आहे कि, पूर्ण शहराच्या मिसिंग लिंक रूमही कागदावर आणा. त्याच्या जमीन अधिकग्रहणाचे प्रश्न सोडविण्यासाठी मी मदत करतो. टीडीआर हा अनेकांना मान्य नाही. टीडीएस वर लोकांचा आक्षेप आहे, त्यावर देखील आपण तोडगा काढू ते मत पाटील यांनी व्यक्त केले.

पाटील पुढे म्हणाले, महानगरपालिकेचे कमिश्नर आणि पालिकेचे रस्ते विभागाचे प्रमुख यांचे अभिनंदन करावेसे वाटते कि त्यांनी एकूण ३१ प्राब्लेम शोधून काढले . यामुळे वाहतूक कोंडी आपल्याला कमी करता येईल. आज प्रामुख्याने कोथरूडचा आमदार म्हणून कोथरूडचा विचार करता १५ प्राब्लेम हे कोथरूडचे आहेत.कोथरूड विधानसभेच्या या १५ जागांचे काम करण्यासाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी निम्मे पैसे राज्यसरकारने आणि निम्मे महानगरपालिकेने द्यावेत असे पाटील यांनी सांगितले. महानगरपालिकेने येत्या बजेटमध्ये शहरासाठी मोठी रक्कम घ्यायची ठरवली आहे. त्यानंतर जमीन अधिग्रहणाचे प्रश्न सुटतील. आज सकारात्मक बैठक झाली जी कोथरूड बेस होती. अतिक्रमण या विषयी आता सरकार अधिक लक्ष देत आहे. या वर्षभरामध्ये सगळे प्रश्न सोडवायचे आहेत, असेही पाटील यांनी सांगितले.

या बैठकीवेळी आमदार योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, वाहतूक शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक पोलीस निरीक्षक जावेद पठाण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संजय कदम, मालमत्ता विभागाचे महेश पाटील, दिलीप काळे, गिरीश दाबकेकर, विजय नायकर, अविनाश संकपाळ, राऊत, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, गणेश कळमकर, कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, माजी नगरसेवक दीपक पोटे, दिलीप वेडे-पाटील, शिवरामपंत मेंगडे, लहू बालवडकर, राहुल कोकाटे यांच्या सह भाजपचे पदाधिकारी आणि महापालिकेचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.