हभप शिरीष महाराज मोरे यांच्या निधनाने इतिहास आणि संत साहित्याचा जाणकार हरपला – चंद्रकांत पाटील

पुणे : जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आणि शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष हभप शिरीष महाराज मोरे (वय-३०) यांचे अकाली निधन झाले. या घटनेमुळे वारकरी सांप्रदयामध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने इतिहास आणि संत साहित्याचा जाणकार हरपला, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज हभप शिरीष महाराज मोरे यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने इतिहास आणि संत साहित्याचा जाणकार हरपला. समस्त हिंदू समाज आणि हिंदुत्वविषयक अभियानाचे मोठे नुकसान झाले आहे. शिरीष महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना!, अशी भावना चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
हभप शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक तसेच शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष, प्रखर हिंदुत्ववादी विचारवंत अशी शिरीष महाराज मोरे यांची ओळख होती. तसेच त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. २० फेब्रुवारीला रोजी मोरे यांचा विवाह होणार होता.