‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे सेवा भवन दौड या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्य विषयी जनजागृतीपर उपक्रमाचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

22

पुणे : ‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे सेवा भवन दौड या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्य विषयी जनजागृतीपर उपक्रमाचे आज आयोजन करण्यात आले होते . उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थतीत आज सकाळी सहा वाजता सेवा भवन दौडचा शुभारंभ करण्यात आला. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सेवा भवन दौड’चे आयोजन करण्यात आले होते.

यांच्यासमवेत चंद्रकांत पाटील यांच्या समवेत यावेळी खा.प्रा.डॉ. मेधा कुलकर्णी, संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, प.महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला यांच्या हस्ते झेंडा दाखवून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते स्पर्धेत विजयी खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.‌ यावेळी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’च्या आरोग्यविषयक जनजागृती मोहिमेचाही प्रारंभ झाला.

या मोहिमेत प्रामुख्याने तज्ज्ञ डॉक्टरांची आरोग्यविषयक व्याख्याने, विविध विषयांवर चर्चासत्र, आरोग्य शिबिरे, जिज्ञासूंचे शंका-समाधान, महिलांसाठी संवादसत्र, योग, स्वास्थ्य, जीवनशैली याबाबतचे मार्गदर्शन आदी कार्यक्रमांचे आयोजन ‘जनकल्याण समिती’तर्फे ‘सेवा भवन’मध्ये केले जाणार आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.