आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुलभ पारदर्शक हवी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

40

मुंबई : आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एनआरआय (NRI), पीआयओ (PIO), ओसीआय (OCI) आणि आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांकरिता प्रवेश प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी “एक खिडकी प्रणाली” लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

‘परदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज, दस्तावेज साक्षांकीकरण, शुल्क प्रक्रिया आणि इतर शैक्षणिक कागदपत्रे एकाच ठिकाणी सादर करता यावेत, यासाठीची प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक असावी’, असे बैठकीत पाटील यांनी सांगितले. पाटील म्हणाले की, एक खिडकी प्रणालीमध्ये राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालये यांचा अधिकाधिक समावेश करून घ्यावा. त्यामुळे विदेशातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात प्रवेश घेण्यासाठी उत्तम संधी निर्माण होईल. या प्रणालीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेत सुधारणा आणि सुलभता येईल आणि महाराष्ट्रातील उच्च शिक्षण क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळेल. त्यासाठी ही प्रणाली अधिक व्यापक आणि प्रभावी करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्यात याव्यात, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी यावेळी दिले.

यावेळी तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ.विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, राज्य सामाईक परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई व संबंधित अधिकारी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.