शासकीय तंत्रनिकेतनमधील तासिका तत्त्वावरील अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेवर द्या, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

48

मुंबई : आज मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शासकीय तंत्रनिकेतनांमधील तासिका तत्वावरील अभ्यागत अधिव्याख्यात्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राज्यातील सरकारी तंत्रनिकेतनामध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या अधिव्याख्यात्यांचे मानधन वेळेत देता येईल, असे नियोजन तंत्र शिक्षण संचालनालयाने करावे, असे निर्देश पाटील यांनी दिले.

चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतनांमध्ये कायमस्वरूपी अध्यापकांच्या बरोबरीने अनेक अभ्यागत अधिव्याख्याते तासिका तत्वावर कार्यरत आहेत. या अधिव्याख्यात्यांना सैद्धांतिक (थिअरी) तासासाठी रुपये ८०० आणि प्रात्यक्षिक तासासाठी रुपये ४०० याप्रमाणे मानधन दिले जाते.याबाबत महाविद्यालयांनी तासिका तत्वावर असणाऱ्या अधिव्याख्यात्यांना दरमहा मानधन मिळेल असे नियोजन करावे.

न्यायालयाने नव्याने तासिका तत्वावर अध्यपकांच्या नियुक्ती करण्यास स्थगिती दिली आहे. वाढती विद्यार्थी संख्या, नवीन अभ्यासक्रम, अधिव्याखात्यांची कमतरता यासंदर्भात न्यायालयात राज्य शासनाची बाजू प्रभावीपणे मांडण्यात येईल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

या वेळी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी, तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक व अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.