मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या एकूण 1337 शिल्लक सदनिकांची रिमोट लोकेशनद्वारे लॉटरी

23

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत राबविण्यात आलेल्या पेठ क्र. 12 आणि पेठ क्र. 30-32 गृहयोजनेतील एकूण 1337 शिल्लक सदनिकांची रिमोट लोकेशनद्वारे लॉटरी काढण्यात आली. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) संकेतस्थळाचे तसेच दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव, नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पीएमआरडीएच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (१ बीएचके) प्रवर्गातील ४७ सदनिका व एलआयजी (२ बीएचके) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत ईडब्ल्यूएस (वन आरके) प्रवर्गातील ३४७ सदनिका व एलआयजी (१ बीएचके) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. यासाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत ३ हजार २७१ लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी ३२५६ अंतिमतः पात्र झाले तर उर्वरित १५ लाभार्थी अपात्र ठरले होते. पात्र लाभार्थ्यांकरिता सदनिकाची सोडत २२ जानेवारीला नियोजित होती. मात्र प्रशासकीय कारणामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. या सदनिकांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे करण्यात आली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.