पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अधिकाऱ्यांना संबंधित सूचना

मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या कामाबाबत आढावा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आला.
या वेळी चंद्रकांत पाटील यांनी स्मारकाच्या कामाच्या सद्यस्थितीबाबत चर्चा करून स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या स्मारकामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या जीवनकार्याची संपूर्ण वाटचाल, महिलांच्या सक्षमीकरणासाठी मार्गदर्शन केंद्र, अध्यासन केंद्र या बरोबरीनेच एक चांगले असे पर्यटनस्थळ असणार आहे.
या बैठकीला आमदार सचिन कल्याणशेट्टी, तंत्रशिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, उपसचिव प्रताप लुबाळ, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार भोसले, विजय कदम व संबंधित अधिकारी उपस्थित होते.