पुणे बार असोसिएशन वार्षिक निवडणुकीत नवनिर्वाचित वकील मंडळींचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सत्कार संपन्न

पुणे : पुणे शहर, तसेच जिल्ह्यातील वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनची वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली. या नवनिर्वाचित सर्व वकिलांच्या सत्कार समारंभाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या वेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार समारंभ पार पडला.
या निवडणुकीत नवनिर्वाचित सर्व वकील मंडळींचा भाजपा कोथरूड वकील आघाडीच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांनी सत्कार केला. यावेळी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.
यावेळी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड. एस. के. जैन, ॲड. सुधाकर आव्हाड, भाजप कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, ॲड. जयदीप पटवर्धन, ॲड. मिताली सावळेकर, बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲड. हेमंत झंजाड, उपाध्यक्ष समीर मुंडे, सुरेखा भोसले, सचिव पृथ्वीराज थोरात यांच्या सह सर्व वकील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.