चंद्रकांत पाटील यांनी शिरीष महाराज मोरे यांच्या घरी दिली सांत्वनपर भेट… स्वीकारले मोरे कुटुंबियांचे पालकत्व

देहू : सामाजिक कार्यकर्ते आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. शुक्रवारी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन शिरीष महाराजांना श्रद्धांजली वाहून महाराजांच्या आत्म्याला सद्गति लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना केली. तसेच, मोरे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी पाटील यांनी संपूर्ण मोरे कुटुंबियांचे पालकत्व स्वीकारले.
चंद्रकांत पाटील यांनी या भेटीदरम्यान सांगितले कि, शिरीष मोरे यांच्या कुटुंबाचे मी पालकत्व स्वीकारत आहे. शिरीष मोरे यांच्या भगिनीच्या खासगी नोकरीची ताईच लग्नाची जबादारी यावेळी पाटील यांनी घेतली. चंद्रकांत पाटील यांनी आजपर्यंत अनेक गरजूना मदतीचा हात पुढे केला आहे. अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची देखील जबाबदारी त्यांनी उचलली आहे. आज पुन्हा एकदा मोरे कुटुंबाची जबाबदारी उचलून त्यांनी आपले दातृत्व सिद्ध केले आहे.
यावेळी शिरीष महाराज मोरे यांचे वडील अरुण मोरे, माधवी निगडे, नरेश गुप्ता, तुकाराम महाराज संस्थानाचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, आणि इतर नातेवाईक उपस्थित होते.