संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्रीय सदस्यता नोंदणी करा, चंद्रकांत पाटील यांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

सांगली : भाजपाचे सध्या देशभर सदस्य नोंदणी अभियान सुरु आहे. आत्तापर्यंत महाराष्ट्र भाजपाने 1 कोटी सदस्य नोंदणीचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. भाजपा सदस्य नोंदणी अभियानामध्ये पंचायत ते पार्लमेंट स्तरावरचे सर्व लोकप्रतिनिधी, बूथ अध्यक्ष ते प्रदेशाध्यक्ष तसेच पक्ष संघटनेच्या सर्व घटकांनी सहभाग घेतला. भाजपा संघटन पर्व अभियानाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील येथील सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
भाजपा संघटन पर्व अभियानाच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील तासगाव-कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जास्तीत-जास्त सदस्य नोंदणी केल्याने सर्व पदाधिकाऱ्यांचा चंद्रकांत पाटील यांनी सन्मान करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सक्रीय सदस्यता नोंदणी करा, अशा सूचना देखील पाटील यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, जिल्हाध्यक्ष दीपकबाबा शिंदे म्हैशाळकर, शेखर इनामदार, दिनकर तात्या पाटील यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.