छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही; केआरकेच्या ट्विटवरून मुख्यमंत्री फडणवीसांची आक्रमक भूमिका

111

मुंबई : छावा चित्रपटाने सर्वत्र धुमाकुळ घातलाय. विकी कौशल, रश्मिका मंदान्ना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेला या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कामगिरी करत आहे. एकीकडे चित्रपट धमाकेदार सुरु असताना दुसरीकडे अभिनेता आणि स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल खान छत्रपती संभाजी महाराजांबद्दल बोलताना पुन्हा एकदा बरळल्याचे पाहायला मिळाले आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल कमाल खानने सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट केली आहे. यापूर्वीही छावा चित्रपटाच्या ट्रेलरवरून त्याने वादग्रस्त वक्तव्य केले होते आणि आता पुन्हा कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कमाल खानने विकिपीडियाचा आधार घेत त्याच्या एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली होती. जी आक्षेपार्ह असल्याने त्याच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फडणवीसांनी विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

कमाल खाननं ट्विटरवर पोस्ट करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. कमाल खानने विकिपीडियाचा आधार घेत त्याच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट लिहिली होती. जी आक्षेपार्ह आहे. या पोस्टवरून त्याच्यावर आता जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली असून फडणवीसांनी विकिपीडियाशी संपर्क साधून वादग्रस्त मजकूर हटवण्याचे आदेश दिले आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटले कि, विकिपीडियावर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जो वादग्रस्त मजकूर लिहिण्यात आला आहे, त्याप्रकरणी सायबर विभागाचे आयजी यशस्वी यादव यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. तर संबंधित यंत्रणेशी संपर्क साधून तो मजकूर हटवण्याचे आदेश दिले असून त्यासाठी जी प्रक्रिया करावी लागेल, ती तातडीने करावी, असे आदेश देखील सायबर विभागाला देण्यात आले आहेत. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत, त्यांच्यासंदर्भात असले लेखन खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया रोखठोक प्रतिक्रिया फडणवीसांनी यावेळी दिली.

सोशल मीडियाची भौगोलिक चौकट नसल्याने नियम आणखं कठीण असल्याचे देखील फडणवीस म्हणाले. अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य असीमित नाही. दुसऱ्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालू शकत नाही. ज्याठिकाणी अश्लीलता परिसीमेच्या बाहेर जाते, त्याठिकाणी कारवाई करणं गरजेचं असतं. यासंदर्भात काही नियमावली करता येईल का, याबाबत आमची केंद्र सरकारशी चर्चा सुरू असल्याची माहिती यावेळी त्यांनी माध्यमांना दिली.

Get real time updates directly on you device, subscribe now.