कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील डर्मा लॅबचे उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संपन्न

71

कोल्हापूर : कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील डर्मा लॅबचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी पाटील यांनी डर्मा लॅबच्या संचालिका डॉ. नुपूर पाटील-खतळकर आणि डॉ. राहुल पाटील यांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर, खा. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खा. धनंजयजी महाडिक, खा. धैर्यशील माने, खा. विशाल पाटील, आ. अमल महाडिक यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी डॉ. नुपूर पाटील-खळतकर यांचे डर्मा लॅब स्किन क्लिनिक आणि डॉ. राहुल पाटील यांचे अथ्रायटिस अँन्ड हुमॅटॉलॉजी सेंटरचे उद्घाटन केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता संपन्न झाले.

डॉ. राहुल पाटील हे रूमेटॉलॉजिस्ट आणि संधिवात तज्ञ असून यांचा संधिवात शास्त्रात गेल्या सात वर्षांपेक्षा जास्त अनुभव असून प्रौढ आणि मुलांमध्ये सर्व प्रकारचे संधिवात आणि स्वयंप्रतिकार आजारांवर उपचार करणारे ते विशेषज्ञ आहेत. डॉ. नुपूर पाटील त्वचारोगतज्ञ असून त्वचा आणि डिव्हीएल मध्ये एन केपी साल्वे नागपूर इथल्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. मुंबईमधून त्यांनी लेझर आणि कॉस्मेटीक डर्मोंटोलॉजीमध्ये फेलोशिप घेतली असून डर्मा लॅब निरोगी त्वचा आणि केसांसाठी सर्व अत्याधुनिक उपचारांसह कोल्हापूरकरांसाठी एक नवीन सौंदर्यशास्त्र क्लिनिक बनणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.