सांगली जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी Additional Task Force ची निर्मिती करणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली : सांगली जिल्ह्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील सध्या गुन्हेगारी रोखण्यासाठी ऍक्शनमोडवर आहेत. ड्रग्स विरोधी टास्क फोर्सनंतर आता गुन्हेगारी रोखण्यासाठी जिल्ह्यात कायद्याचा धाक निर्माण करण्यासाठी Additional Task Force ची निर्मिती करणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
याबाबत माहिती देताना पाटील म्हणाले, नुकत्याच दोन अशा घटना जिल्ह्यामध्ये घडल्या ज्यामध्ये एका घटनेत महिलेचा गळा चिरला जाण आणि दुसऱ्या घटनेमध्ये एका तरुणाचा तलवारीने पाठलाग करण. या दोन्ही घटना लक्षात घेता आजपासून आम्ही एक नवीन टास्क फोर्स सुरु करत आहोत. जिल्ह्याच्या ऍडिशनल एसपी रितू खोकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये एकूण सहा डीवायएसपी असतात अशांचा मिळून एक टास्क फोर्स तयार करत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
या टीमने शनिवारपर्यंत एक रिपोर्ट द्यायचा आहे कि, ज्यामध्ये कायद्याचा धाक आपल्याला कसा देता येईल याबाबत ते माहिती देतील. गस्त वाढवण्याची गरज आहे का , मॅन पॉवर वाढवण्याची गरज आहे का, होमगार्ड सारख्या एजन्सीची मदत घायची आहे का, याचा विचार करता येईल. त्यासोबचत छोट्या पोलीस चौक्या वाढवाव्या लागतील का, जेणेकरून त्या त्या भागात एक धाक राहील. याबाबतचा सगळा विचार करण्यासाठी या Additional Task Force ची निर्मिती करण्यात आली आहे. याचादेखील दर आठ्वड्याला आम्ही आढावा घेणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.