भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची नामदार चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. नुकतेच त्यांनी कोथरुड मतदारसंघातील कर्वेनगर भागातील गोल्डन पेटल्स सोसायटीच्या मागणीनुसार सोसायटी परिसरात लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे कार्यान्वित केले. रविवारी या उपक्रमाचे लोकार्पण चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, भविष्यातही नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली.
यावेळी गोल्डन पेटल्स सोसायटीच्या वतीने कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्याबद्दल आणि नागरिकांच्या मागणीला त्वरित प्रतिसाद देत मनपा आणि राज्यसरकार येथे कार्यवाही करून दाखविलेल्या तत्परतेकरिता चंद्रकांत पाटील यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
याप्रसंगी भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ.संदीप बुटाला, भाजपा नेते सुशील मेंगडे, वृषाली चौधरी, शिवरामपंत मेंगडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तेजल दुधाने यांच्यासह सोसायटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.