१५ व्या ‘उत्कर्ष’ सामाजिक सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इमारत आणि मध्यवर्ती प्राणीगृह इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते अनावरण

पुणे : राज्याचा उच्च व तंत्रशिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १५ व्या ‘उत्कर्ष’ सामाजिक सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संशोधन विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह इमारत आणि मध्यवर्ती प्राणीगृह इमारतीचे भूमिपूजन तसेच कोनशिलेचे अनावरण देखील पाटील यांनी केले.
‘उत्कर्ष’ सामाजिक सांस्कृतिक स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी बोलताना पाटील म्हणाले, NSS चे काम खूप महत्वपूर्ण आहे. त्याचे महत्व मी जाणतो, त्यासंदर्भात मी खूप काम केलं आहे. त्यामुळे शिक्षण मंत्री झाल्या झाल्या तीन लाख तीस हजाराचा जी विद्यार्थी संख्या सहभागी होतु शकते ती संख्या आम्ही पाच लाख केली. इतके विद्यार्थी NSS मध्ये सहभागी होऊ शकतात. NCC हे मिलेटरीच्या अखत्यारीत आहे. मी त्यांनाही जाऊन भेटणार आहे. NCC मुळे डिसिप्लिन शिकवले जातात. त्यामुळे त्याची देखील संख्या वाढवणार असल्याचे पाटील यांनी यावेळी सांगितले. कॉलेज जीवनामध्ये जर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला तर उरलेल्या आयुष्यसाठी एक व्हिजन मिळते, असे विधान यावेळी पाटील यांनी केले.
पाटील पुढे म्हणाले, आपल्याला जे आयुष्य जगावंसं वाटत ते इतर चार जणांना देता येईल का या विचाराने आम्ही मानसी उपक्रम सुरु केला. यासाठी एक पॅकेज तयार केलं. यामध्ये दर तीन महिन्यांनी मेडिकल चेकअप आहे. या चेकमध्ये ज्या कमतरता निघतील त्यावर औषध आणि खाणंपिणं हे सगळं मोफत असणार. योग, सॅनिटरी नॅपकिन मोफत आहे. पार्लर देखील मोफत आहे. अशा सुविधांची माहिती पाटील यांनी यावेळी दिली. त्यानंतर त्यांनी महिलांच्या गरोदरपणातील समस्येवर भाष्य केले. ते म्हणाले कि २० ते ८० वयोगटातील महिलांसाठी सगळ्या आरोग्यविषयक सुविधा या मोफत करण्याचा आम्ही निर्णय घेतला. तर NSS च्या माध्यमातून समाज वाचायला शिका असे पाटील म्हणाले. कारण वाचल्याशिवाय दृष्टी निर्माण होत नाही. आज तुमचा कल्चर फेस्टिवल आहे त्याचा मोटिव्ह आहे कि तुम्ही सगळे कार्यक्रम सामाजिक प्रश्नांवर करावेत. आपण सगळ्यांना NSS आणि NCC च्या माध्यमातून जीवनदृष्टी मिळावी अशी अपेक्षा यावेळी पाटील यांनी व्यक्त केली.
यावेळी राज्यसंपर्क अधिकारी डॉ. निलेश पाठक, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु पराग काळकर, प्रभारी कुलगुरू डॉ. ज्योती भाकरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रसेनजीत फडणवीस, ज्योत्स्ना एकबोटे, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, डॉ. संदीप पालवे, बागेश्री मंठाळकर, सागर वैद्य, यांच्यासह इतर मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.