राजभवन आयोजित २६व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने विजयी मोहोर… मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंची घेतली भेट

मुंबई : राजभवन आयोजित २६व्या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवात मुंबई विद्यापीठाने विजयी मोहोर उमटवली आहे. यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व खेळाडूंची आज भेट घेतली आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, विद्यापीठाने क्रीडा महोत्सवात ४३० गुणांची कमाई करत सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. पुरुष गटात २०० गुण आणि महिला गटात २३० गुणांचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला. क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती वाढावी आणि त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळावी, असा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पाटील यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या या क्रीडारत्नांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.रवींद्र कुलकर्णी, प्र कुलगुरू प्रा डॉ.अजय भामरे, क्रीडा प्रशिक्षक व विद्यापीठाचे अधिकारी कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.