नामदार चंद्रकांत पाटील यांनी महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील विविध शिवमंदिरात जाऊन घेतले महादेवाचे दर्शन… उपस्थित भाविकांना दिल्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील हे बुधवारी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी महाशिवरात्रीनिमित्त त्यांनी विविध शिवमंदिरांना भेटी देऊन महादेवाचे दर्शन घेतले आणि मनोभावे पूजा केली.
कोथरुड मतदारसंघातील पाषाण, बाणेर आणि सोमेश्वरवाडी, मृत्यूंजयेश्वर मंदिर, श्री ओंकारेश्वर मंदिर या सर्व ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून महादेवाचे दर्शन घेतले. तसेच उपस्थित भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देखील दिल्या. मृत्यूंजयेश्वर मंदिरात आलेल्या भाविकांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊन चंद्रकांत पाटील यांनी प्रसाद वाटप केले.
ओंकारेश्वर मंदिरात त्यांनी आरती केली. गौरव बापट आणि स्वरदा बापट यांच्या पुढाकाराने मंदिरात या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी आणि अनेक भक्तगण उपस्थित होते. यावेळी खा. मेधाताई कुलकर्णी देखील उपस्थित होत्या.