संघटनवाढीसाठी सक्रीय सभासद नोंदणीमध्ये सर्वांनी योगदान द्यावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : आज भाजपा कोथरूड मतदारसंघाची सक्रिय सभासद नोंदणीची बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून संघटनवाढीसाठी सक्रीय सभासद नोंदणीमध्ये सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन केले. या बैठकीस भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
कोथरूड मतदार संघाची सक्रिय सदस्य नोंदणीची आढावा घेण्यासाठी बैठक कोथरूड विधानसभेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हि महाबैठक, शिवसमर्थ हॉल, एमआयटी कॉलेज रोड, तुळजाभवानी माता मंदिराजवळ संपन्न झाली. या बैठकीत कोथरूड मतदार संघात 900 सक्रिय सदस्य करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. संघटनवाढीसाठी सक्रीय सभासद नोंदणीमध्ये सर्वांनी योगदान द्यावे असे पाटील यांनी यावेळी आवाहन केले.
यावेळी रवी अनासपुरे, शहराचे सरचिटणीस पुनीत जोशी, मंडल अध्यक्ष संदीप बुटाला, सचिन पाषाणकर व अन्य पदाधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत मतदारसंघातील सर्व शहर-मंडळ-प्रभाग पदाधिकारी, लोकप्रतिनिधीसह बूथ प्रमुख-शक्ती केंद्र प्रमुख उपस्थित होते.