नामदार चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून कोथरूडमधील सोसायट्यांमध्ये इंसिनरेटर मशीनची सुविधा, सोसायटी रहिवाशांनी याबद्दल मानले पाटील यांचे आभार

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघात विविध उपक्रम राबवित असतात. नागरिकांच्या सुविधा पुरविण्यासाठी अनेक नवनवे उपक्रम देखील ते राबवितात. अशाच प्रकारचा नवा उपक्रम पाटील यांनी कोथरूडमध्ये राबविला आहे. सेनिटरी नेपकिन, मोठे आणि छोटे डायपर अशा कचऱ्याची शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या संकल्पनेतून उत्तर कोथरूड मंडळ च्या 8 सोसायटिंमध्ये इंसिनरेटर मशीन बसविण्यात आले आहे. त्यामुळे या सोसायट्यासाठी नवी सुविधा उपलब्ध झाली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने कोथरूडमध्ये इंसिनरेटर मशीन बसविण्यात आले आहे. या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन उत्तर कोथरूडच्या महिला मोर्चा अध्यक्षा सौ अस्मिता करंदीकर यांनी केले. महिला मोर्चा सचिव सौ प्राजक्ता देवस्थळी व सौ मौसमी बकोरे यांनी व्यवस्थापन पाहिले.
कोथरूमधील प्रकृती, पर्ल, आदित्य ब्रिज, ला विदा, साई कॅनरी सोसायटीमध्ये इंसिनरेटर मशीनचा वापर सुरू करण्यात आला आहे. सर्व सोसायटी रहिवाशांनी याबद्दल आभार मानले असून, असे जास्तीत जास्त उपक्रम सुरू करण्यात यावेत, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.