मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजपा कार्यालयाला सदिच्छा भेट, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत केले उत्साहात स्वागत

28

कोल्हापूर : मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूर भाजपा जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाध्यक्ष तसेच स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देत उत्साहात स्वागत केले. फडणवीस यांच्या भेटीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याने केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन देवेंद्रजींनी करून जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना संघटन पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एकसंघ काम केल्यामुळं राज्यात महायुतीची सत्ता आली, मागच्या वेळी कोल्हापुरात नव्यानं बांधण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आलो तेव्हा, मुख्यमंत्री नव्हतो. आता मुख्यमंत्री होऊन भाजपा कार्यालयात आलो. जनतेनं दिलेल्या आशीर्वादामुळं आता आपली जबाबदारी वाढली आहे, ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. जिल्ह्यात महायुतीचे सर्व आमदार निवडून देऊन कोल्हापूरकरांनी महायुतीवर विश्वास व्यक्त केला, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार अमल महाडिक, आमदार राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.