छत्रपती संभाजीमहाराजांच्या शौर्याशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही!; अनिल परब यांना निलंबित करा, भाजपा आमदार आक्रमक

49

मुंबई : काल अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषद सदस्य ॲड अनिल परब यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांशी स्वतःची तुलना केली यासोबतच महामहीम राज्यपालांचा देखील अपमान केला या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. छत्रपती संभाजी महाराज आणि महामहीम राज्यपाल यांचा अपमान करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाच्या अनिल परब यांचा निषेध केला.

अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना अशोभनीय असून, सभागृहात त्यांनी जाहीर माफी मागावी;धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे त्यांच्या शौर्याशी कोणाचीही तुलना होऊच शकत नाही! सांगत भाजप आमदारांनी अनिल परबांच्या वक्तव्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला व त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली असल्याचे आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले.

यावेळी भाजपा विधानपरिषदेचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, सुभाष देशमुख, कालिदास कोळंबकर, श्रीकांत भारतीय,चित्रा वाघ, उमा खापरे, योगेश टिळेकर, विक्रम काळे, राणा जगजितसिंह पाटील, अमित गोरखे आदी आमदार उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.