११ मार्च रोजी कोथरूडमध्ये ‘ड्रग्ज मुक्त कोथरूड अभियान’, या सामाजिक उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा; चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

11

पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सांगलीमध्ये ड्रग्स मुक्त अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे, आणि आता त्यांनी कोथरूड मध्ये देखील ‘ड्रग्ज मुक्त अभियान’ राबविण्याचे ठरविले आहे. यासाठी पुढाकार घेत ड्रग्ज मुक्त कोथरूड संदर्भातला पहिला कार्यक्रम मंगळवार, ११ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते ८:०० पर्यंत कोथरूड मधील हुतात्मा राजगुरू स्मारक, करिश्मा चौक येथे पार पडणार आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे पाटील यांनी आवाहन केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक व्हिडीओ शेअर करत म्हटले कि, परंपरागत दारू, दारूतील अनेक प्रकार, सिगारेट याच्या पुढे आता नशा जायला लागली आहे. वर्षानुवर्षे पाच हजार वर्षांच्या इतिहासात हे सगळे वर्ज्य मानले जात होतेच, कारण त्यातून फायदा काहीच नव्हता. फक्त शरीराची हानीच होती. परंतु आता हे पुढचे जे प्रकार झालेले आहेत ज्यामध्ये गांजा, सिगार, नशील्या गोळ्या , ड्रग्सचे वेगवेगळे प्रकार आहेत, त्याचे सेवन करणे आहे. या सर्व पदार्थांची शरीराला सवय लागणं हे शेवटचं टोक आहे. अनेक श्रीमंत घरातील मुलं या सर्व पदार्थांसाठी आपापल्या घरात चोरी करायला लागले. ती गोष्ट मिळाली नाही तर तरुण वेडापिसा होत जातो असे पाटील म्हणाले.

पाटील पुढे म्हणाले, यापासून तरुण पिढी वाचवायची असेल तर आताच ठोस पावलं उचलली पाहिजेत. यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करावं लागेल. त्यासाठी कोथरूडमध्ये अभियान राबवत असल्याचे पाटील म्हणाले. अनेक मंडळांनी यात सहभागी होऊन सामाजिक सेवा करावी असे पाटील यांनी आवाहन केले. दिवसेंदिवस अंमली पदार्थांचा प्रादुर्भाव वाढत आहे. अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांसंदर्भात माझ्या कोथरूडमध्येही जनजागृती व्हावी यासाठी “ड्रग्ज मुक्त कोथरूड अभियान” हा सामाजिक कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या ड्रग्ज मुक्त कोथरूड संदर्भातला पहिला कार्यक्रम मंगळवार, ११ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६:३० ते ८:०० पर्यंत कोथरूड मधील हुतात्मा राजगुरू स्मारक, करिश्मा चौक येथे पार पडत असून; या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा!, असे आवाहन पाटील यांनी केले.

यावेळी काही भाषणं , ड्रग्स विरोधी प्रतिज्ञा घेतली जाईल. पुढे जाऊन शाळांमध्ये देखील प्रबोधन केले जाईल. सांगली जिल्ह्यामध्ये देखील याबाबत प्रबोधन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. चलातर मग , एकत्र येऊन आपल्या, कोथरूडला ड्रग्ज मुक्त बनवूया!

Get real time updates directly on you device, subscribe now.