चंद्रकांत पाटील यांचा पुण्यात शिक्षणानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात… जिव्हाळा फाऊंडेशनच्या मदतीने विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे १०० डबे सुरु

23

पुणे : पुण्यात शिक्षणानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष करुन विद्यार्थिनींना पोषक आहार मिळत नसल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याची बातमी मध्यंतरी पाहण्यात आली होती. या बातमीनंतर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावर लक्ष केंद्रीत करत त्यावर उत्तम असा मार्ग काढला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात शिक्षणानिमित्त येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या स्टुडंट्स हेल्पिंग हॅण्डच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली होती. तसेच, लोकसहभागातून विद्यार्थ्यांना पोषक आहाराचे डबे देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिव्हाळा फाऊंडेशनच्या मदतीने १०० डबे सुरु करता आले आहेत. जिव्हाळा फाऊंडेशन एक सामाजिक संस्था आहे जी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा आणि आरोग्य यांसारख्या विविध क्षेत्रात काम करते, विशेषतः गरजू आणि वंचित मुलांसाठी.

याबाबत समाधान व्यक्त करत विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून अतिशय आनंद झाला असल्याचे पाटील यांनी म्हटले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी विद्यार्थिनींशी संवाद साधून; सर्वांना महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.