केदार एम्पायर, कर्वे रस्ता येथे आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाट्न संपन्न

10

पुणे : केदार एम्पायर, कर्वे रस्ता येथे आज आयोजित केलेल्या आरोग्य चिकित्सा शिबिराचे उदघाट्न उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उदघाट्न प्रसंगी त्यांनी उपस्थित महिला डॉक्टर्सना कॅडबरी देऊन त्यांचा सन्मान देखील केला.

यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिला डॉक्टर्सचा सन्मान करण्यात आला. दरम्यान, नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी आरोग्य तपासणीसाठी आणखी एक बस उपलब्ध करून देणार असल्याचे यावेळी पाटील यांनी जाहीर केले. तसेच सध्या उपलब्ध असलेल्या एका बसमध्ये सर्व प्रकारची अद्यावत उपकरणे बसविणार असल्याचेही त्यांनी आश्वस्त केले.

या प्रसंगी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेवक दीपक पोटे, माजी नगरसेवक जयंत भावे, मंजुश्री खर्डेकर, शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसुले,सुनील पांडे, मंडल अध्यक्ष डॉ. संदीप बुटाला, प्रभाग अध्यक्ष एड. प्राची बगाटे, सुभाषशेठ नाणेकर, सौ. कल्याणी खर्डेकर,राजेंद्र येडे, निलेश गरुडकर, बाळासाहेब धनवे, वैभव जमदाडे, श्रीकांत गावडे, अपर्णा लोणारे, मंगलताई शिंदे, सुमित दिकोंडा, सतीश कोंडाळकर, राम भिसे, विनायक गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.